Ad will apear here
Next
‘पुणे सिलिंडरमुक्त करण्याचा ‘एमएनजीएल’चा निर्धार’
नैसर्गिक गॅसची माहिती देणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन


पुणे : ‘पुण्याला सिलिंडरमुक्त करण्याचा निर्धार महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) केला असून, भारतात २०२०पर्यंत दोन कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे,’ असे ‘एमएनजीएल’चे संचालक राजेश पांडे यांनी सांगितले.  

पाच नोव्हेंबर २०१८ रोजी हॉटेल प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, ‘एमएनजीएल’चे संचालक संतोष सोनटक्के यांच्या उपस्थितीत नैसर्गिक गॅसची माहिती देणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन हस्ते करण्यात आले.

पांडे म्हणाले, ‘पुण्यात घरोघरी पाइपद्वारे गॅस देण्याचे नियोजन केले जात असून, प्रशासकीय अडचणी न आल्यास पुणे शहराला दीड वर्षात ‘सिलिंडरमुक्त’ करू. २०२०पर्यंत दोन कोटी घरांपर्यंत पोचण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. २२ नोव्हेंबरपासून देशातील १०० जिल्ह्यांत या कामाला सुरुवात होणार आहे. त्यातील चार जिल्हे ‘एमएनजीएल’कडे देण्यात आले आहेत. हा गॅस नैसर्गिक, सुरक्षित, स्वच्छ आणि स्वस्त असून, सहज उपलब्ध आहे.’

‘केवळ ५०० रुपये भरून हा गॅस सोसायट्यांमधील घरांना मिळू शकतो. पाच हजार रुपये अनामत रक्कम टप्प्याटप्प्याने मासिक २५० प्रमाणे भरून उपलब्ध होऊ शकतो. उर्वरित बिल गॅस प्रत्येकाच्या वापराप्रमाणे येईल. पुणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि घरे, उद्योग आणि वाहनांसाठी या गॅसचा उपयोग करता येणार आहे,’ अशी माहिती पांडे यांनी दिली.



‘सोसायट्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून नैसर्गिक गॅस आणि ‘एमएनजीएल’च्या योजनांची माहिती असणारा विशेषांक १६ हजार गृहनिर्माण संस्थांपर्यंत दिवाळीत पोहोचविला जाणार आहे. त्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाची मदत घेण्यात आली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री बापट म्हणाले, ‘पालिका पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ‘एमएनजीएल’चे संचालक यांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर पाठपुराव्याची व्यवस्था ‘एमएनजीएल’ने तयार करावी. आता दीड लाख घरांत पोहोचलेला नैसर्गिक गॅस वर्षभरात अडीच लाख घरांत गेला पाहिजे.’

खासदार शिरोळे यांनी शहरात ‘एमएनजीएल’ पाइपसाठी खोदाईचे काम पूर्ण होत आले आल्याने सर्व कनेक्शन लवकरात लवकर देणे आता शक्य असल्याचे सांगितले.

सोनटक्के म्हणाले, ‘नैसर्गिक गॅस हा वीज, पेट्रोल, सीएनजीला पर्याय असून, घरगुती वापर, औद्योगिक वापर आणि वाहनांसाठी तो वापरता येणार आहे.’

‘भाड्याने घर दिलेल्या मालकांकडून गॅस पाइप जोडण्यात दिरंगाई केली जाते म्हणून त्यांना प्रति महिना ५० रुपये भरून गॅस भाडेकरूंना जोडून देता येणार आहे. वापरानुसार बिल भाडेकरूंना भरता येईल. सोसायट्यांना सामूहिक नोंदणीत ७० टक्के सवलत दिली जाईल,’ असे ‘एमएनजीएल’ अधिकारी मिलिंद रणशेट्टीवार यांनी सांगितले.

‘सर्वांच्या हिताच्या या योजनेत ‘एमएनजीएल’ला पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ जनजागृतीत सर्व सहकार्य करेल,’ अशी ग्वाही पटवर्धन यांनी दिली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZWOBU
Similar Posts
‘पंतप्रधानांनी देशातील राजकीय कार्यसंस्कृती बदलली’ पुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण राजकीय कार्यसंस्कृती बदलली आहे. यापूर्वी निर्णय न घेणे हाच मोठा निर्णय आणि धोरणलकवा हीच देशाची अवस्था होती. ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन लोक कित्येक निवडणुका जिंकले; पण गरिबांसाठी कधीच काम केले नाही. मोदींनी आणलेल्या कार्यसंस्कृतीत देशातील गरिबाच्या जीवनात
पुण्यात ‘आयुष्यमान भारत’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशभरात आयुष्यमान भारतअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला प्रारंभ झाला. या योजनेचा प्राथमिक लोकार्पण सोहळा पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात २४ सप्टेंबरला पार पडला.
‘सीएम चषक खेळातील क्रांतीचा नवीन इतिहास रचेल’ अटल क्रीडा नगरी (पुणे) : ‘महाराष्ट्रातल्या क्रीडा प्रतिभेला शोधून त्यांना मोठा मंच देण्याच्या दिशेने सीएम चषक नवीन अध्याय लिहील; तसेच युवा पिढीत संघटन, सह अस्तित्व आणि सहकाराचा भाव निर्माण करण्याच्या दिशेनेसुद्धा हे आयोजन लक्षणीय ठरेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे व्यक्त केला
पुण्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता पुणे : दिव्य ज्योती परिवार आणि दिव्य ज्योती जागृती संस्थानतर्फे आयोजित केलेल्या सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता दिव्य ज्योती जागृती संस्थानचे संस्थापक व संचालक प.पू. सर्वश्री आशुतोष महाराज यांच्या शिष्या आणि भारतातील विख्यात भागवत भास्कर भागवताचार्या विदुषी सुश्री वैष्णवी भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language